HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

मुंबई | राज्य सरकारने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केल्यानंतर अनेक गोष्टींना चालना मिळाली आहे. तपास यंत्रणां देखील जुन्या फाईलींवरची धूळ झटकून कामाला लागली आहे. बँकिंग क्षेत्रात गाजलेल्या येस बँक घोटाळ्यात ईडीने आज (८ जून) मुंबईत बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले. दोन ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी घेतली झडती लॉकडाउननंतर अचानक ‘ईडी’ने कारवाईचा लावल्याने येस बँक घोटाळ्यातील संशयितांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

येस बँकेतून मोठी कर्जे घेतलेल्या कंपन्या ‘ईडी’च्या रडारवर आहेत. आज पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर ‘ईडी’कडून छापे टाकण्यात आले. ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या आधी मार्च महिन्यात ‘ईडी’ने ‘कॉक्स अँड किंग्ज’चे प्रवर्तक पीटर केरकर यांना समन्स बजावले होते.

‘प्राइसवॉटर कूपर्स’ने फेब्रुवारीत केलेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. तसेच २१००० कोटींचा निधी संशयास्पदरित्या वळवला असल्याचे देखील तपासाअंती समोर आले होते. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात कॉक्स अँड किंग्जचे शहरातील मुख्य कार्यालय आहे. यासह चार आणखी कार्यालयात आज ‘ईडी’च्या तपास पथकांनी धाडी टाकल्या आहेत. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे त्यासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता, कंपनीचे आर्थिक व्यवहार आदी माहिती घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं”, भाई जगतापांची प्रतिक्रिया

News Desk

आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी! – मुख्यमंत्री

Aprna

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक! – उद्धव ठाकरे

Aprna