HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या…पुण्यात आजपासून काय सुरू, तर काय बंद असणार ?

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेला लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. देशभरात आज (८ जून) अनलोकचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यात खासगी कार्यलयात १० टक्के उपस्थितीवर सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबईत बेस्ट सुरू झाली आहे. तसेच पुण्यात प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार, कोरोना उपाय योजना संदर्भात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे.

पुण्यात पालिकेच्या आयुक्तांनी तीन टप्प्यात अटी-शर्तीमध्ये शिथिलीता मिळणार आहे. याबरोबर आजपासून वर्तमानपत्रांचे घरपोच वितरण करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास पुणे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य चाकरमान्यांचे, तसेच छोट्या मोठ्या उद्योजकांचे जीवन पूर्वपदावर प्रयत्न सुरू आहे. पुण्याच्या आयुक्तांनी दिलेल्या मान्यतांसह शहरातील विविध रस्त्यांवरील अधिकृत व्यावसायिक यांना दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करता येईल.

अशी आहे पुण्यातील नियमावली

  • खाजगी कार्यालये (१० टक्के मनुष्यबळासह)
  • लग्न समारंभ (५० व्यक्तींसह)
  • अंत्यसंस्कार अनुषंगिक कार्यक्रम (२० व्यक्ती)
  • अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय
  • माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती व पॅकेजिंगकरिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती
  • दालमिळ, अन्न प्रक्रिया उद्योग
  • घरकाम करणाऱ्या व्यक्ती (घर मालकाची इच्छा असल्यास)
  • ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस
  • वर्तमानपत्रे वितरण व स्टॉल (स्टॉल वितरण मुभा )
  • वित्तीय क्षेत्र (कमीत कमी व आवश्यक कर्मचारी वर्गासह)
  • ई-कॉमर्स (घरपोच वस्तूंचे वितरण)
  • माहिती तंत्रज्ञान (माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय)
  • खाद्य पदार्थ सेवा (खाद्यपदार्थ पार्सल सेवा)
  • बांधकाम विषयक (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बाहेरील मजूर न आणता कामाच्या ठिकाणी मजूरांच्या राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशा बांधकाम प्रकल्पांना मान्यता)
  • मेट्रो काम
  • धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई

पुण्यात हे बंदच राहणार

  • शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस
  • थिएटर्स, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, नाट्यगृहे
  • राजकीय, धार्मिक, क्रीडा, कार्यक्रमांना परवानगी नाही
  • सलून, ब्युटी पार्लर

पुण्यातील या रस्त्यावरी दुकाने सुरू

  • शिवाजी रस्ता : पुणे मनपा – डेंगळे पुल – शनिवारवाडा ते जेथे चौक
  • बाजीराव रस्ता : पुरम चौक – माडीवाले कॉलनी – शनिवार चौक – विश्रामबागवाडा – शनिवारवाडा़
  • हडपसर : सोलापूर रोड – मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्दपर्यंत़ तसेच गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रोडने पुणे शहर हद्दीपर्यंत़
  • सातारा रोड : जेधे चौक – लक्ष्मीनारायण थिएटर, सिटी प्राईड, विवेकानंद पुतळा, धनकवडी फ्लाय ओव्हर ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रोडने पुणे शहर हद्दीपर्यंत़
  • नगर रोड : येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी ते पुणे शहर हद्दीपर्यंत़
  • एअरपोर्ट रोड : गुंजन चौक- गोल्फ क्लब रोड, येरवडा पोस्ट आॅफिस-नागपूर चाळ-जेल रोड पोलीस चौकी, संजय पार्क – ५०९ चौक – एअरपोर्ट़
  • सिंहगड रोड : दांडेकर पुल – पानमळा – रोहन कृतिका लगत, नाकोडा नगर – राजाराम पुल – विठ्ठलवाडी , संतोष हॉल – आनंदनगर, माणिकबाग – वडगाव धायरी उड्डाणपुल, धायरी फाटा -धायरी शेवटचा बसस्टॉप़
  • पौड रोड : खंडोजीबाबा चौक – स्वांतत्र्य चौक – नळ स्टॉप – कर्वेरस्ता फ्लायओव्हर- आनंदनगर – शास्त्री नगर, कोथरूड बस डेपो -चांदणी चौक
  • जंगली महाराज रोड : संचेती चौक – झाशी राणी चौक – डेक्कन जिमखाना – संभाजी पुतळा – खंडोजी बाबा चौक
  • एफसी़रोड : खंडोजीबाबा चौक – गुडलक चौक – वैशाली हॉटेल – फर्ग्युसन कॉलेज – संत ज्ञानेश्वर पादुका चौक – शिवाजीनगर पोलीस स्टेशन
  • गणेशखिंड रोड : शिमला चौक – म्हसोबा चौक – सेट्रल मॉल – शासकीय तंत्रनिकेतन – विद्यापीठ चौक – राजभवन – इंदिरा गांधी झोपडपट्टी – राजीव गांधी पूल औंध – पुणे शहर हद्दीपर्यंत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही, महापालिकेने दिली माहिती

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ! आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या पार

News Desk

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६४२७ । राजेश टोपे

News Desk