HW News Marathi
Covid-19

न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर यशस्वी मात

मुंबई | जगभरात बुहतांश देश हे कोरोनाच्या विळख्यात आहे. हे देश कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. तर दुसऱ्या बाजुला न्यूजीलंड या देशाने कोरोना व्हायरसवर पूर्णपणे मात केली आहे. न्यूजीलंडमध्ये आज (८ जून) कोरोनाचा शेवटा एक ॲक्टिव्ह रुग्ण बरा झाला आहे. यामुळे आता न्यूजीलंडमध्ये गेल्या १७ दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही.

न्यूझीलंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर पुढील आठवड्यात देश करोनामुक्त झाला असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात १५०४ जणांना करोनाची बाधा झाली होती. न्यूजीलंडमध्ये १,५०४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात २२ लोकांचा मृत्यू झाला. न्यूजीलंडमध्ये गेल्या १७ दिवसात जवळपास ४० हजार लोकांचा कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, यात गेल्या १२ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण सांपडला नसून रुग्णालयात दाखल झालेला नाही. न्यूजीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांच्या मार्गदर्शनने कोरोनावर मात करण्यात आल्याचे बोले जाते आहे.

पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी आज हे जाहीर केले की, न्यूझीलंड या आठवड्यात लेव्हल १ च्या पुढे गेला आहे. या अंतर्गत न्यूजीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा निर्बंध कायम राहतील परंतु सार्वजनिक कार्यक्रमावर मर्यादा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

News Desk

राज्याचा रिकव्हरी रेट ९०. ३१ टक्के झाला

News Desk