HW News Marathi
देश / विदेश

…तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का?

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या बाजुने प्रसिद्ध वकील हरीश साळवे युक्तीवाद करत होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर, आम्ही न्यायालय म्हणून त्यांच्या मदतीसाठी आहोत, हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. अर्णब गोस्वामींच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या वकील हरिश साळवे यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. तर, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले असून त्यांची बाजू ऐकल्याशिवास निर्णय देऊ नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

यावेळी साळवे यांनी न्यायालयाला जर महाराष्ट्रात राज्य सरकारचे नाव लिहून किंवा त्यांना दोष देत जर कोणी आत्महत्या केली तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का, असा सवाल केला आहे. महत्वाचे म्हणजे २ दिवसांपूर्वीच एसटीच्या कंडक्टरने आत्महत्येस ठाकरे सरकार (शिवसेना) जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहत गळफास लावून घेतला होता. एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे –

*आपली लोकशाही सर्वसाधारणपणे लवचिक आहे, महाराष्ट्र सरकारने हे सर्व दुर्लक्षित केलं पाहिजे.

*जर एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने आणली तर, हे न्यायाचे अध:पतन होईल.

*महाराष्ट्र सरकारला याप्रकरणात कोठडी देऊन चौकशीची गरज वाटते? आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा करत आहोत.

*जर संवैधानिक न्यायालय हस्तक्षेप करत नसेल तर आपण विनाशाच्या वाटेनं आहोत.

*आम्ही याप्रकरणी सुनावणी करत आहोत, कारण उच्च न्यायालयाने जामीन दिला नाही आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षणही केलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नसतील

News Desk

महात्मा गांधी ‘हे’ तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ‘ते’ जीवन !

swarit

आता आरबीआय २० रुपयांची नवी नोट चलनात आणणार

News Desk