मुंबई | अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती.
Supreme Court orders Republic TV editor-in-chief Arnab Goswami and other co-accused be released on interim bail. pic.twitter.com/WveX5XglSl
— ANI (@ANI) November 11, 2020
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, “अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे. अर्णब गोस्वामी यांनी सर्व वेंडर्सना नियमित पैसे दिले आहेत.” तसंच हे प्रकरण पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांचं पालन केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला होता.
आत्महत्येस प्रवृत्त करणं व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं. गोस्वामी यांना तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केलं होतं. राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये अशी विनंती केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.