HW News Marathi
Covid-19

आज २९३३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई । राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (४ जून) दिली.

 

सध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६, नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस दलातील चौथा बळी

News Desk

कोल्हापूरात उद्या मराठा आरक्षण लढ्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक, संभाजीराजेही राहणार उपस्थित

News Desk

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तोबा गर्दी, हजारोंच्या जमावाकडून लॉकडाऊनच्या नियमांची ऐशीतैशी

News Desk