HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, राजदूतांनी मागितली माफी

वॉशिंग्टन | अमेरिकेत सध्या वर्णभेद सुरू आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना मृत पावलेल्या जॉर्ज फ्लॉएड यांना न्याय मिळावा यासाठी अमेरिकेत अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये काही आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. फ्लॉएड यांच्या मारेकरी पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वॉशिंग्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ आंदोलन सुरू आहे.

आंदोलनादरम्यान काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेबद्दल भारतातील अमेरिकेच्या राजदुतांनी दु:ख व्यक्त करत या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली आहे. जॉर्ज फ्लॉएड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आंदोलकांनी जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानीत मोठ्या प्रमाणात नॅशनल गार्ड्स तैनात केले आहेत.

व्हाईट हाऊस परिसरातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचे ट्रम्प यांनी समर्थन केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वॉशिंग्टनमधल्या कारवाईनंतर संपूर्ण देशासमोर एक उदाहरण असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर आजपासूनच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

News Desk

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची गरज | लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

Gauri Tilekar

एफ-१६ या लढाऊ विमानाशी आमचा संबंध नाही | मेजर गफूर

News Desk