रायगड | राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे जळगावातील एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या या आत्महत्येला कोण जबाबदार? सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की परिवहन मंत्री अनिल परब यांना? असा सवाल भाजपचे नेते विचारत आहेत.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राज्यात विविध ठिकाणी आक्रोश आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातूनच जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी या कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली.
माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप मृत मनोज चौधरी यांनी केला आहे. तशी सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली आहे. याच मुद्द्यावरुन राज्य सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री की परिवहन मंत्र्यांना? असा सवाल भाजप नेते किरिट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार राम कदम यांनी विचारला आहे.
Ratnagiri Jalgaon ST Driver & Conductor committed Suicides, in their Dying Declaration they said "Thackeray Sarkar is responsible for their Atmahatya as they have not received Salaries" Whom Thackeray Sarkar will arrest Transport Minister? Chief Minister? for abetment 4 Suicide
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 9, 2020
तर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरुन सरकारला प्रश्न विचारला आहे. वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्या घटना आहे. एसटी कर्मचार्यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही.ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे.
एसटी कर्मचार्यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? असा प्रश्न फडणवीसांनी सरकारला विचारला आहे.
वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्या घटना आहे.
एसटी कर्मचार्यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.