HW News Marathi
महाराष्ट्र

जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात, केबल चालक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई | जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळे आमचा धंदा धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे घेऊन मुंबईतील केबलचालक राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे केबल चालकांचे म्हणणे आहे.

आता राज ठाकरे मुंबईतील केबलचालकांची कशाप्रकारे मदत करणार, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन अ‍ॅपममध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्याविरोधात ‘मनसे’कडून आवाज उठवण्यात आला होता. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकीही दिली होती. मनसेच्या या इशाऱ्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला होता. या आधी डबेवाले, ग्रंथालय चालक, जिम चालक, कोळी भगिनी यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची सरकारकडे मागणी | सुरेश धस

swarit

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२५

News Desk

नको ‘त्या’ गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Aprna