HW News Marathi
Covid-19

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, कोरोनापासून वाचायचे असल्यास मास्क बंधनकारक

नवी दिल्ली | नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले आहे. दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आतापर्यंतची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, असं सत्येंद्र जैन म्हणाले. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच सध्या एकमेव उपाय असल्याचे जैन यांनी सांगितले आहे.

आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी नवी दिल्लीत सरकारने कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवली असल्याची माहिती दिली. मात्र, कोरोना रुग्णांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचे नियोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लवकरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला नागरिकांची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचही आरोग्यमंत्री जैन म्हणाले आहेत. काही लोकांना मास्क नाही घातला तर काही होत नाही, असं वाटतं हे चुकीचे आहे, असंही जैन म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

News Desk

राज्यातील हॉटस्पॉट ठिकाणांचा लॉकडाऊन वाढवावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

News Desk

अदानी शरद पवारांना जाऊन भेटले अन् …! राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप 

News Desk