HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत 

मुंबई | कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (७ नोव्हेंबर) राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

तसेच प्रार्थना स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे, भाजप यांनी महाराष्ट्रातील मंदिरं कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र सरकारला विचारला. त्यासाठी आंदोलनंही केली. आता धार्मिक स्थळं दिवाळीनंतर उघडतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करताना हे आदेश दिले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि राज्य कृती गटाचे तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते.

मार्चपासून नियंत्रण मिळविण्यासाठी आपण लढत असून या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश येत असल्याचे दिसत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा टाळेबंदी केली आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरांत असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरला असला तरी आरोग्यविषयक खबरदारी घेतल्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याविरोधातील जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच: बाळासाहेब थोरात

News Desk

नांदगावपेठेत भूमिहीन बेघरांना जागा मालकी हक्कपत्र वाटप आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी! – ॲड. यशोमती ठाकूर  

Aprna

“सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?”, नारायण राणेंचा गंभीर सवाल

News Desk