HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त जागांसाठी आघाडी सरकारकडून ‘या’ १२ जणांच्या नावाचा समावेश

मुंबई | राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज (६ नोव्हेंबर)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे.

काँग्रेस-

१) सचिन सावंत

२) रजनी पाटील

३) मुजफ्फर हुसैन

४) अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काँग्रेस-

१) एकनाथ खडसे

२) राजू शेट्टी

३) यशपाल भिंगे – साहित्य

४) आनंद शिंदे – कला

शिवसेना –

१)उर्मिला मातोंडकर

२) नितीन बानगुडे पाटील

३) विजय करंजकर

४) चंद्रकांत रघुवंशी

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. “राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,” असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

“राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आता राज्यपाल किती काळात या नावांची निश्चितता देतील याकडे सरकारचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या जागेची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

News Desk

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, सेनेचा योगींना सल्ला

News Desk

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन

News Desk