HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारकडून ‘अनलॉक १’साठी तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात होणार

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच (३० मे) आपली नियमावली जाहीर केली होती. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची नियमावली आज (३१ मे) जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत महाराष्ट्रात अनलॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याला ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला ५ जूनला सुरूवात होणार आहे. आणि तिसरा टप्पा ८ जूनला सुरू करण्यात येणार आहे.

कंटेन्मेट झोनमधील कार्यालय वळगत इतर ठिकाणची कार्यलये सुरू होणार आहे. पार्किंगप्रमाणे सम-विषम पद्धतीन दुकाने सुरू करणार आहे. कॅरेज सुरू करण्याची सुरू करण्यास मुभा दिली आहे. रिक्षा आणि ट्रक्सी चारचाकीमध्ये चालक अधिक २ प्रवाशांची मुभा तर दुचाकीवर एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे. दोन जिल्ह्यातंर्गत प्रवासा प्रवानगी दिलेली आहे. सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे याठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.

३ जूनपासून अशी मिळणार सूट

  • सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे याठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
  • गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना
  • सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती ५ टक्के होती

५ जूनपासून अशी असणार सूट

  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
  • कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
  • कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अंमलात असणार नाही.
  • खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
  • अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
  • खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.

 

८ जूनपासून अशी असणार सूट

  • खाजगी ऑफिसेसमध्ये 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणं अनिवार्य. उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय
  • कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता
  • कामावर असणाऱ्या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक
  • वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसंच कॅब- १+२, रिक्षा-१+२, चारचाकी- १+२, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )

बंद असणार

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक
  • मेट्रो रेल्वे
  • ट्रेन्सची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे तुर्तास बंद
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर राऊत म्हणाले…

News Desk

लॉकडाऊनमुळे सांगलीत अडकलेले ४८० नागरिक तामिळनाडूत सुखरूप पोहोचले

News Desk

पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, लॉकडाऊनसंदर्भात होणार चर्चा

News Desk