HW News Marathi
Covid-19

मुंबईत येत्या आठवड्याभरात आणखी ८ हजाराहून अधिक बेड्स उपलब्ध होणार !

मुंबई | राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहे. यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या आठवड्यभरात ८ हजारहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. मुंबईसह जवळपासच्या गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. तर येत्या काही दिवसात गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत करोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात असून खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. यात अतिदक्षा विभागातील बेड्सचाही समावेश आहे. गोरेगाव येथे २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करण्यात आली. तसेच मुलुंड येथे २००० खाटा, दहिसर येथे २००० आणि भायखळा येथेही २००० खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात तेही कार्यान्वित होईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम! – मुख्यमंत्री

News Desk

मोदींच्या थाळ्या पिटण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला मात्र विरोध !सामनातून रोखठोक ताशेरे …

News Desk

कोरोनावर मात करुन अखेर नवनीत राणांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

swarit