HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या सभेला दोन्ही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची अनुपस्थिती

मुंबई। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अखेर उशीर का होईना काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी काल (१३ ऑक्टोबर) धारावी आणि चांदिवली मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभे दोन्ही मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या मुंबई काँग्रेसचे अध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस उमेदवार नसीम खान यांच्या चांदिवलीतील सभेला काँग्रेस नेत्या प्रिया दत्त उपस्थितीत होत्या, मात्र मिलिंद देवरा आणि संजय निरुपमांनी गैरहजर होते. राहुल गांधी यांची धारावी येथील सभा मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आयोजित केली होती. येथे देखील मिलिंद देवरा आणि संजय निरूपम गैरहजर होते.

मुंबई काँग्रेसमधील मिलिंद देवरा आणि संजय निरूपम या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद कायमच चर्चेचा विषय असतो. यामुळे मुंबईमध्ये अंतर्गत वाद चवाट्यावर आला आले. यापैकी मिलिंद देवरा यांनी लोकसभेतील पराभवानंतर आत्मचिंतन करत आहेत. ते सध्या केवळ ट्विटरवर सक्रिय आहेत. तर दुसरीकडे तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या संजय निरूपम यांनी यापूर्वीच आपण प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमधील विकास आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर किशोरी पेडणेकरांबरोबर प्रसारमध्यमांसमोर बोलण्याची तयारी! – प्रविण दरेकर

Aprna

‘त्या’ प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

Aprna

अखेर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Aprna