HW News Marathi
Covid-19

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे |औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलापैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज (२९ मे) उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनामुळे राज्यात आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार देखील लवकरच पॅकेज देणार असल्याची माहिती राज्याचे अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज औंध ते काळेवाडी साई चौक इथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन वेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सण साधेपणाने साजरे करा ! मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना होळी, धुळवडीच्या शुभेच्छा अन् आवाहन

News Desk

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना, २० जणांचा मृत्यू

News Desk

लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, शिवसेना खासदाराचे थेट मोदींना पत्र

News Desk