HW News Marathi
Covid-19

एका कोरोना रुग्णामुळे बीड शहरासह १२ गावांमध्ये पुढील आठ दिवस संचारबंदी

मुंबई | बीड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी अनेक आसपासच्या गावांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांशी संपर्कात आल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासनाने हादरुन गेले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर बीड शहरासह १२ गावांत पुढील आठ दिवस पूर्णवेळ २४ तास संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे संपूर्ण बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण व इट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव या गांवामध्ये आठ दिवसांसाठी संचारबंदी राहणार आहे.

तसेच बीड जिल्ह्यात एकूण ५६ कोरोना रुग्णांची संख्या आहेत. यापैकी एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झालाय तर ६ रुग्ण पुणे येथे पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले.दरम्यान आतापर्यंत ३ रुग्ण कोरोनामुक्त करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ४६ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानायक ‘अमिताभ बच्चन’यांना कोरोनाची लागण

News Desk

राज्यात आज ६,७४१ नवे रुग्ण, तर २१३ जणांचा झाला मृत्यू

News Desk

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

News Desk