HW News Marathi
Covid-19

एकासाठी तीन हे रडव्यांचे लक्षण… रडून नको, करुन दाखवा !

मुंबई | “विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली. घाबरताय कशाला ? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला ? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको!”, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काल म्हणजेच बुधवारी (२७ मे) महाविकासआघाडीने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकासाआघाडीच्या नेत्यांच्यावर ही बोचरी टीका केली आहे.

“आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!”, असेही एक ट्विट आशिष शेलार यांनी केले. इतकेच नव्हे तर पुढे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले कि, “तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना”, असे सवाल उपस्थित केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मदत मिळत असूनही राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा स्पष्ट सूर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत लागला. त्यानंतर काल(२७ मे) राज्यातील महाविकासआघाडी सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांचे हे सर्व दावे फेटाळून लावले. देवेंद्र फडणवीसांच्या त्या पत्रकार परिषदेचा उल्लेख आभासी पत्रकार परिषद असा केला. त्यानंतर, आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. सलग ७ ते ८ ट्विट्स करत आशिष शेलार यांनी महाविकासाआघाडी सरकार निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

१८ मेपासून तमिळनाडूतील सरकारी कार्यालये सुरु होणार

News Desk

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर

News Desk