HW News Marathi
महाराष्ट्र

‘लव्ह जिहाद’ निवडणूक प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही! – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहादच्या’ निमित्ताने एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, यांनीसुद्धा हरियाणा राज्यात कायदा करण्याबाबत विचार मांडलेला आहे. लव्ह जिहादचा विषय निवडणुकीच्या प्रचाराचा होऊ शकत नाही, अशी भूमिका शिवसेना उपनेत्या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविषयी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अल्पवयीन मुलींवर दबाव आणून किंवा फूस लावून धर्म बदलण्यासाठी भाग पाडले जाते. मुलींना पळवणाऱ्या टोळ्या हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. अनेकदा अतिरेकी विचारासाठी या अल्पवयीन मुलींचा उपयोग केला जातो व त्यांचा थांगपत्ताही लागत नाही. अठरा वर्षांच्या वरच्या वयोगटातील मुलगी व एकवीस वयाच्या वरील मुलगा अशा असणाऱया दोन व्यक्ती हे स्वत:च्या इच्छेनुसार कुठल्याही जातीत व कुठल्याही धर्मात लग्न करू शकतात, स्वतःचा संसार करू शकतात.

त्यामुळे याबद्दल निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा तात्पुरता घेऊन सोडून देण्यापेक्षा अल्पवयीन मुलींचे हिताच्या भुमीकेतून व धर्मांतरासाठी केली जाणारी सक्ती या चौकटीमधून विषय पाहिला जावा असे वाटते. म्हणून जे स्वेच्छेने विवाह करतात आणि जिथे कुठलाही दबाव नाही त्या लोकांना भरडले जाऊ नये हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा, प्रश्न एका तासात निकाली लागू शकतो!

News Desk

राज्यसरकारने प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय द्यावा लागला असता

News Desk

‘पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

News Desk