मुंबई | “मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले, तरी सरकार हे महाविकास आघाडीचे आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा होत असतात. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत,” असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले. नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप बोलताना म्हणाले.
‘आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे,’ असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असले, तरी सरकार हे महाविकास आघाडीचे आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा होत असतात. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांशी कधीही बोलू शकतात, काही अडचणी सांगू शकतात, पृथ्वीराज चव्हाणांनीही मुख्यमंत्र्यांशी आवश्यक तेव्हा संवाद साधावा, ते महत्त्वाचे नेते आहेत.”
पृथ्वराज चव्हाणा यांची कथित ऑडिओ क्लिप
या ओडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि एका कार्यकर्त्यामध्ये दूरध्वनीवरील संवाद सुरू आहे. यात स्थानिक कार्यकर्त्यांनी निधीच्या अपेक्षेने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे.” कार्यकर्ता म्हणाला, “तुमचे नाव मोठे आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे.” “जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही” अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याची ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते.
संबंधित बातम्या
आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.