HW News Marathi
Covid-19

अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

मुंबई | ठाकरे सरकारच्या काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनावरील पुढील उपचारासाठी अशोक चव्हाण हे आज (२५ मे) नांदेड-मुंबई हा प्रवास ते बाय रोड अर्थार रस्तेमार्गे करत आहेत. या प्रवासासाठी किमान १२ तास अपेक्षित आहेत. तो प्रवास करुन, अशोक चव्हाण मुंबईत पोहोचतील. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार घेतली.

दरम्यान, अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असून मुंबईकडे रवाना झाले. लॉकडाऊनच्या काळात अशोक चव्हाण नांदेडमध्ये होते. पण, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ते मुंबईला आले होते. निवडणुकीनंतर चव्हाण हे पुन्हा नांदेडला परतल्यानंतर त्यांनी ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळे ठेवले होते. नांदेडमधील रुग्णालयात चव्हाण यांनी स्वॅब तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच उपचार घेतले. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचारासाठी रवाना झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांनी ॲानलाईन बकरा खरेदी केला आहे का ? बकरी ईदवरून राजकारण तापलं !

News Desk

महाराष्ट्रात एकाचं दिवसात १००८ रूग्ण ,एकट्या मुंबईत ७५१ रूग्ण

News Desk

महाराष्ट्रात कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले, काय आहेत नवे नियम?

News Desk