HW News Marathi
महाराष्ट्र

या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार !

मुंबई | या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राम मंदिरासाठी विशेष कायदा करा, सल्ला उद्वव ठाकरेंनी केंद्र सरकारला दिला आहे. ठाकरे पुढे असे देखील म्हणाले की, शिवसेना राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही. धनगराच्या काठीला तलवाराची धार लागली पाहिजे.

तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आले असे म्हणत ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर टीका केली आहे. वयामुळे नाही तर भ्रष्टाचारमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी थकली असल्याचे म्हणत सुशील कुमार शिदेंवर निशाना साधला. सुडाचे राजकारण करत असे तर तो शिवरायांचा शिष्य नाही, म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंची प्रतिक्रिया दिली. पवारांच्या ईडीच्या खटल्यावर बोलताना, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या खटल्याची आठवण सांगितले.

दरम्यान, जागा न मिळाल्याची माफी मागतो, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले, जागा कमी पडल्या तरी ताकत कमी पडू देऊ नका, असे आव्हान शिवसैनिकांना केले आहे. शिवसेना-भाजपची युती ही जनतेने स्वीकारली, असे सांगत उद्धव ठाकरेंनी जागा वाटपावरून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार, असा इशारा ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे

 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • प्रमाणिक पणे युतीचे काम करायचे
  • जागा कमी पडल्या तरी चालतील मात्र, ताकत कमी पडता कामा नये
  • जागा न मिळाल्याची माफी मागतो
  • डोक्यात सत्ता शिरली तर कोणीही विचारत नाही
  • जिथे जिथे जागा सुटल्या त्या शिवसैनिकांची मी माफी मागतो
  • मला प्रत्यके गावात आणि खेड्यात शिवसैनिक असला पाहिजे असे वाटत
  • संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिल 30 टक्क्यांनी कमी करणार
  • सुदृढ महाराष्ट्र्र घडवण्यासाठी एक रुपयात आरोग्याची चाचणी करणारा
  • ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना बस सेवा देणार
  • १ रुपयांत आरोग्य चाचणी आणि १० रुपयात अन्न थाळी देण्याचे आश्वासन
  • सरकार स्थापन होताच, शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार असे आश्वासन दिले
  • सुडाचे राजकारण करत असे तर तो शिवरायांचा शिष्य नाही, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईला उत्तर
  • वयामुळे नाही तर भ्रष्टाचारमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी थकली असल्याचे म्हणत सुशील कुमार शिदेंवर टीका
  • तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आले, अजित पवारांवर टीका
  • महाराष्ट्रला नाही तर देशद्रोही काँग्रेसला पाठिंबा द्याचा ?
  • भारत भगवामय करण्यासाठी युती झाली
  • शिवसेना- भाजपची युती महाराष्ट्राने अधीच स्वकारली आहे.
  • धनगराच्या काठीला तलवाराची धार लागली पाहिजे
  • आमची जनतेच्या सेवेसाठी वचन बध आहोत,
  • राम मंदिर हे सत्ता मिळविण्यासाठी नाही
  • प्राण जाय पय वचन ना जाय, शिवसेनेने जनतेला दिलेल्या वचन आहे
  • विशेष कायद करा आणि अयोध्येत राम मंदिर बांधा, ही शिवसेनेनेची मागणी कायम आहे
  • आता युती झाली आहे जरा जपून बोलावे लागेत
  • एका महिन्यात दोन विजय दशमी, आजचा दसरा आणि २४ तारखेचे निकाल
  • विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी निघालोय
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या ‘ त्या ‘ वादग्रस्त वक्तव्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंबंधी आज सुनावणी

News Desk

४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!

News Desk

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

Aprna