HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना ऑफर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात, संजय राऊतांचा खुलासा

पुणे | भाजप पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकतात’ असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊतॉयांनी केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग यावरून राजकारण करू नये !

News Desk

तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे, योग्य वेळी तलवार फिरवेन! – उद्धव ठाकरे

Aprna

ऑक्सफोर्ड-केम्ब्रिज विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा सुरू, पण शरद पवारांना माहिती नाही !

News Desk