HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : राज्यात १५०४ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

मुंबई । विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कल (७ ऑक्टोबर) शेवटची तारी होती. यावेळी नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये एका दिवसात तब्बल ८४ उमेदवारांनी त्याचे अर्ज मागे घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. यामुळे भोकर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघात तब्बल १३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संख्येत भोकर राज्यात अव्वल ठरले होते.मात्र, आता १३४ पैकी ९१ अर्ज वैध ठरले होते.

तब्बल ९१ उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र शेवटच्या दिवशी तब्बल ८४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहे. आता भोकरमध्ये केवळ ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यभरात २८८ मतदारसंघातून एकूण १५०४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ४७३९ वैध उमेदवारांपैकी आता ३२३९ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

या मतदारसंघात सर्वाधिक आणि सर्वात कमी उमेदवार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात फक्त ३ उमेदवार तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात ३१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी ३ बॅलेट युनिटची आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट एकच लागणार आहे.

आचारसंहितेनंतर ४८.२ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारु, १५ कोटी २९ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य! – चंद्रकांत पाटील

Aprna

“आता यांच्या घरी पोरं होईल होतील का हे मी कसं सांगू?” पत्रकारांच्या प्रश्नांना राज ठाकरेंचं मिश्कील उत्तर

News Desk

तासगाव तालुक्यात  देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार ?

News Desk