HW News Marathi
Covid-19

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

मुंबई | करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले त्यावेळी वर्षा गायकवाड बोलत होत्या. हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.

राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टल चा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

News Desk

“कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना?, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

News Desk

“माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेनं करायचं, तर मग आपण काय करणार?”, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk