HW News Marathi
Covid-19

‘या’ कारणामुळे नवनिर्वाचित भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल

बीड | विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड यांनी बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रमेश कराड यांच्यासह २२ जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कराड यांच्यासमवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड आणि १५ जण होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे आणि प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

संबंधित बातम्या

जाणून घ्या…भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवारी मिळालेल्या रमेश कराड यांच्याबद्दल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा रायगड जिल्हा दौरा रद्द

News Desk

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

News Desk

बीड जिल्ह्यात असा साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन !

News Desk