HW News Marathi
महाराष्ट्र

सगळ्यांसाठी मुंबई लोकल लवकर सुरु करण्याचा सरकारचा विचार!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या ८ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असं ट्वीट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी ट्वीट केलं आहे.

काय केले आहे प्रवाशाने ट्वीट?

एका प्रवाशाने ट्वीट करत म्हटलं होतं की, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे.”

 

विजय वडेट्टीवारांनी काय दिले उत्तर?

प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलं की, ‘पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.’

सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लोकल सगळ्यांसाठी लवकर सुरु करावी यासाठी सर्व स्तरांतून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकलसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, लोकल सर्वांसाठी कधी सुरु करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच वडेट्टीवारांनी प्रवाशाच्या ट्वीटला दिलेलं उत्तर हे लोकल लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन!

News Desk

मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंसोबत वाद ?

News Desk

अखेर गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk