मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील विविध राज्यात अडकलेल्या मंजूर, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक विशेष ट्रेनची सोय करण्यात आली. सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी पुढील २ ते ३ दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
We are going to announce the resumption of more trains in the upcoming days. We have also permitted the operation of shops at railway stations. However, only takeaways will be allowed: Railway Minister Piyush Goyal https://t.co/tEfZ3D6LEv
— ANI (@ANI) May 21, 2020
भारतीय रेल्वे मंत्र्यालयाने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० ट्रेन्सची यादी जाहीर केली आहे. या ट्रेनसाठी आज ( २१ मे) बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० लाख मजुरांना श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. अजून काही ट्रेन सुरू करण्याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. देशाचे कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीनव पुन्हा रुळावर आण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे रेल्वे मंत्री म्हणाले. ट्रेन सुरु झाल्याने लवकरत तिकीट काऊंटरही सुरु केले जाणार आहेत. आता ज्या ट्रेन सुरु आहेत, त्याची तिकीट बुकिंग ऑनलाईनच सुरु आहे. तिकीत काऊंटर सुरु झाल्यानंतर यासाठी काही प्रोटोकॉल विकसित करण्यावर आम्ही अभ्यास करत आहोत, असे त्यांनी माहिती दिली.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्रीसह आता काही ठराविक रेल्वे स्थानकांवरदेखील जाऊन रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. तसेच सध्या देशातील १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.