HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेची तिसरी यादी, बाळा नांदगावकर यांना उमेदवारीच नाही

मुंबई । मनसेने विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची तिसरी यादी काल (३ ऑक्टोबर) जाहीर केली आहे. आता तिसऱ्या यादीत मनसेने ३२ उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेच्या तिन्ही यादीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे नाव नाही. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

पहिल्या टप्प्यात मनसेकडून २७ उमेदवारांची नावे घोषित केली होती. दुसऱ्या टप्प्यात मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मनसेच्या तीनही यादीच आतापर्यंत १०४ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मनसेने अद्याप वरळी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मनसे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे

  • भांडूप- पश्चिम संदीप जळगांवकर
  • विक्रोळी- विनोद शिंदे
  • मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण
  • वडाळा- आनंद प्रभू
  • उरण- अतुल भगत
  • पिंपरी- के.के. कांबळे
  • मिरा-भाईंदर- हरीष सुतार
  • बार्शी- नागेश चव्हाण
  • सांगोला- जयवंत बगाडे
  • कर्जत-जामखेड- समता इंद्रकुमार भिसे
  • शिरूर – कैलास नरके
  • आंबेगाव – वैभव बाणखेले
  • खेड आळंदी – मनोज खराबी
  • पुणे कँटोन्मेंट – मनिषा सरोदे
  • उमरगा – जालिंदर कोकणे
  • ओवळा माजिवडा – संदीप पाचंगे
  • पालघर – उमेश गोवारी
  • विक्रमगड – वैशाली सतीश जाधव
  • बदनापूर – राजेंद्र भोसले
  • राजापूर – अविनाश सौंदाळकर
  • दौंड – सचिन कुलथे
  • पुरंदर – उमेश जगताप
  • भोर- अनिल मातेरे
  • चाळीसगांव – राकेश जाधव
  • वसई – प्रफुल्ल ठाकूर
  • डहाणू – सुनील इभान
  • देवळाली – सिद्धांत मंडाले
  • लातूर ग्रामीण अर्जुन वाघमारे
  • भंडारा – पूजा ठक्कर
  • वरोरा – रमेश राजूरकर
  • भुसावळ – निलेश सुरळकर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

शिवसेना मोठी होण्यात माझा मोठा वाटा आहे!

News Desk

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk