HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांसोबत आज राजभवनात महत्वाची बैठक

मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज (२०मे) सायंकाळी ७ वाजता राजभवनमध्ये उच्चस्तरिय बैठक होणार आहे. राज्यपालांसोबत करोना स्थितीवर अशी ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होत आहे. याबैठकीत राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, पालिका आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक आणि अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत कालपर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा २२ हजारच्यापुढे गेला होता तर राज्यात ही संख्या ३७ हजारच्या पुढे गेली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र-राज्य दोन्ही सरकारे प्रयत्नशील आहेत. मात्र, आता राज्यामध्ये विरोधी पक्ष सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप येत्या २२ मे रोजी राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन छेडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आज (२० मे) एका व्हिडीओमार्फत ही माहिती दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी,भाजीविक्रेत्याच्या मृत्यु ..

Arati More

अवघ्या तासात रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंग २० जूनपर्यंत गाड्या फुल्ल

News Desk

कुठल्या प्रश्नावर आंदोलनं करायची याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही !

News Desk