HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

मुंबई | शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फैलावर घेतले होते. उद्धव ठाकरेंनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतवरही टीका केली होती.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना राणावतने प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असं विधान कंगनानं केलं आहे.

“मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे फक्त जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधीही कुणीतही होतं. लवकरच हे जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखं का वागत आहेत?,” असं कंगनाने ट्विट करत म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकांचे सेवक असताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसणाऱ्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. हे घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,” अशी टीकाही कंगनानं केली आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1320571848233340928?s=19

तसेच, ट्विटमध्ये आणखी एक व्हिडिओ शेअर करत सोनिया सेनेने तिला कसे अपशब्द उच्चारत अपमानित केले हे देखील ट्विटमध्ये तिने म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत पुन्हा एकदा कंगनाने नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. या व्हिडिओत तिने सोनिया सेना तसेच संजय राऊत यांनी आधी तिला हरामखोर असे म्हटल्याचा उल्लेख केला आहे. आणि उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणात तिला नमक हराम म्हटलं आहे असं म्हटले आहे. यावेळी तिने असेही म्हटले की महाराष्ट्राचे लोक तुमच्या कामामुळे खुश नाही आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1320619622484209664?s=19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगाव तालुक्यात  देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार ?

News Desk

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

News Desk

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आणखी एकाचा मृत्यू, राज्यातील कोरोनाचा चौथा बळी

swarit