HW News Marathi
Covid-19

#LockDown4 : लॉकडाऊनमध्ये काय सुरू-काय बंद, तर कोणत्या गोष्टींना मिळणार परवानगी

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांच्या वर पोहोचली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने आज (१७ मे) चौथ्या लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या चौथ्या लॉकडाऊनची नवीन नियमावली सरकारने तयार केली आहे. यानुसार काय सुरू राहणार आणि काय बंद हे ठरवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे रोजी देशवासियांना संबोधित करताना चौथ्या लॉकडाऊनची कल्पना दिली होती. मात्र, राज्यांनी दिलेल्या सुचनानुसार चौथ्या लॉकडाऊन असेल असे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे देशवासियांना चौथ्या लॉकडाऊनबद्दल उत्सुक होते. जाणून घ्या… चौथ्या लॉकाऊनची काय सुरू असणार तर काय बंद राहणार आहे. तसेच देशातील कोणत्या झोनमधून प्रवास करण्यास कोण्या अटी नियम आहेत.

काय बंद असणार

  • आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
  • मेट्रो सेवा
  • शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिकवणीला परवानगी
  • हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार
  • चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
  • सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम
  • सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार
  • धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही.

काय सुरु असणार

  • ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार.
  • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यासा परवानगी नाही.
  • स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार.
  • सरकारी कार्यालये सुरु होणार.
  • सरकारी कॅन्टिन सुरु राहणार.

कंटेनमेंट, बफर, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी नियमावली

  • झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आलं आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी तशी मागणी केली होती.
  • रेड, ऑरेंज, कंटेननेंट आणि बफर झोनचे सीमांकन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या नियमावलींची दखल घेणे गरजेचे आहे
  • कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
  • मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन पाहणी गरजेचे
  • रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.

कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात या गोष्टींना मर्यादांसह परवानगी

  • होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार
  • पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
  • राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत गाड्या आणि बसने वाहतूक

नियम आणि अटी

  • बाजारपेठ उघडण्याच्या नियमांचा निर्णय राज्य घेईल
  • आंतरराज्य बसेस चालवण्याचा निर्णय राज्य घेईल
  • लग्नात ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध
  • मास्क घालणे अनिवार्य आहे
  • लॉकडाऊनचे उल्लंघन करणे कायदेशीर गुन्हा
  • अंतिम संस्कारात २० पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नाही
  • किमान कर्मचारी कार्यालयात बोलवावेत, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
  • केंद्र सरकारकडून राज्य सरकारांवर जास्त जबाबदारी
  • सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यावर कारवाई

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे मानले आभार!

News Desk

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk