मुंबई | राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र काम करत आहे. आपले कर्तव्य बजावताना पोलीस दलातील आतापर्यंत १, २०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सध्या ९१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत गेल्या २४ तासात, ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत २८३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
1,206 police personnel have been infected with #COVID19 across the state till now, with 66 new cases reported in last 24 hours including 912 active cases, 283 recovered, and 11 fatalities: Maharashtra Police pic.twitter.com/1ZQQruspTJ
— ANI (@ANI) May 17, 2020
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. काल (१६ मे) १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आतपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.