मुंबई | कोरोनाचा विळखा अजूनही कमी झाला नाही आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात लोकं अडकले आहेत. त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी सरकार सुविधा करत आहे. अत्यावश्य सेवा वगळता सर्व काही बंद आहे. आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना राज्य सरकार आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून E-Pass देण्यात आला आहे. मात्र, सरकारकडून देण्यात येणाऱ्या या E-Pass सुविधेत सरकारचे कोणतेही नियोजन नसल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
या राज्य सरकारचे नियोजन शून्य कारभार चे परत एक उद्धरण👇
हजारो नी e pass दिल्या नंतर यांना आता कळले की जिल्ह्याची क्षमता नाही!
मग e pass देताना नियोजन का केले नाही?
आता जे चाकरमानी गावा कडे निघाले आहे त्यांना कुठल्या तोंडानी सांगणार?
महाराष्ट्र उद्रेक अटळ आहे अस दिसतय! pic.twitter.com/TqVYdiQVRo— nitesh rane (@NiteshNRane) May 17, 2020
जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी पास देऊ नका अशा आशायचं पत्र जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सर्व महत्वाच्या शहरांतील पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. नितेश राणे यांनी या पत्राचाच आधार घेत सरकारला प्रश्न विचारला आहे. हजारोंच्या संख्येने E-Pass दिले आणि त्यानंतर कळले की जिल्ह्याची क्षमता नाही आहे. मग E-Pass देताना नियोजन का केले नाही? आणि आता जे चाकरमानी गावाकडे निघाले आहेत त्यांना कुठल्या तोंडाने सांगणार? महाराष्ट्राचा उद्रेक अटळ आहे अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. आणि सरकार असर्थ असल्याचे दाखवून दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.