HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला

मुंबई | देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ३१ मे नंतर पुढील निर्णय सूचित करण्यात येईल, असे राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले असून आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. १८ मे पूर्वी लॉकडाऊन ४ ची माहिती दिली जाईल, असे मोदींनी सांगितले होते.

देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळ आणीबाणीची, नागपूरकर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनाही डोळेझाक करता येणार नाही !

News Desk

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

News Desk

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही!

News Desk