HW News Marathi
देश / विदेश

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

नांदेड | मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. ‘दसरा गेला, आता त्यांची ‘दिवाळी तरी गोड करा’ अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली.

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा !

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजा मुंडे हया मराठवाडयाचा दौरा करत असून आज (२० ऑक्टोबर) त्यांनी नांदेड जिल्हयातील धनगरवाडी ता. नांदेड, कारेगाव, पारडी ता. लोहा येथे बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी संकटात सापडलेल्या बळीराजाशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याची व मदत करण्याची खरी गरज आहे. शेतकरी उपाशी राहू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. तसेच पंचनामे करताना भेदभाव झाला नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकांना विनाविलंब सरसकट नुकसान भरपाई द्यावी, त्यांचा दसरा गेला, आता दिवाळी तरी गोड करावी. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कसलीही चालढकल न करता राज्य सरकारने पुढे यावे. तथापि, केंद्र सरकारचा विषय असेल तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

दुर्गाष्टमीपर्यंत तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगार आक्रमक

ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “हा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. परंतू यात फाटे फोडण्याचे काम झाले. हा संप मी सुरू केला आहे. कामगारांच्या दरवाढीबाबत मी वारंवार साखर कारखाना संघाकडे आग्रह धरला आहे. संबंधित नेत्यांनाही बोलले आहे. लवादा सोबत चर्चा करून हा प्रश्न मिटण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे दुर्गाष्टमीपर्यंत यावर तोडगा नाही निघाला तर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजधानीत पावसाचं धूशान!

News Desk

मोदी-शहा पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी उद्या पुण्यात येणार

News Desk

पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे !

News Desk