नांदेड | संपूर्ण राज्यभरात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी सत्ताधारी तसेच विरोधी नेते करत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही शेतकऱ्यांना भेटत धीर दिला आहे.शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या आहेत.
“आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे, देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी काल (२० ऑक्टोबर) नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. आता राज्य सरकारने उशीर करू नये. प्रत्येक पिकाबाबतचे ठोकताळे ठरवून शेतकऱ्यांना आताच मदत देणे गरजेचे असल्याचं मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.