HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या मराठी भाषेच्या मागणीला Amazon कडून प्रतिसाद

मुंबई | मराठी भाषेच्या वापराबद्दल कायमच आग्रही असलेल्या मनसेने अमेझॉन त्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मनसेच्या या भूमिकेची अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अमेझॉन.इन या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे.

मनसेचे अखिल चित्रे यांनी अमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अमेझॉनने स्पष्ट केले आहे.

अखिल चित्रे यांनी अमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. मनसेच्या मागणीची खुद्द बेजॉस यांनी दखल घेतली आहे. अमेझॉनचे शिष्टमंडळ आज मुंबईत येत असल्याचंही चित्रे यांनी म्हटलं आहे. ‘तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं राजसाहेब म्हणतात,’ असंही चित्रे यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे.

 

काय होती मनसेची भूमिका?

१६ ऑक्टोबरला मनसेने मराठी भाषा उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. अमेझॉन आणि फ्लिपकार्टने ७ दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या अ‍ॅपवर आणावा अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. ज्या प्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिले आहे तिथे त्यांच्या भाषेत अ‍ॅप सुरु केलं तसंच अ‍ॅप महाराष्ट्रात मराठीत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा होईल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी आज या दोन्ही कार्यालयांना भेट देत खडे बोलही सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच यक्ष प्रश्न”, महापौरांचा टोला

News Desk

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

News Desk

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ

News Desk