नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाची बिघडलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याची सविस्तर माहिती अर्थंमत्री निर्मला सीतारामन देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी आज (१५ मे) केली. त्यानुसार खाद्यतेल, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अन्नधान्याचा साठा करता येणार आहे. साठेबाजीबद्दल नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ अशा अपवादात्मक स्थितीतच विचारणा होणार असून गरज पडली तरच सरकार यात हस्तक्षेप करणार आहे.
शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. जिथे चांगला भाव, तिथे शेतमाल विकण्याची मुभा असेल. शेतकऱ्यांना परराज्यातही माल विकता येणार आहे. इतर उत्पादनांवरही मालविक्रीची बंधने नसतील. जीवनावश्यक वस्तू कायदा कृषी क्षेत्राच्या वाढीस मोठा अडथळा मानला जात असे.
Government will amend Essential Commodities Act to enable better price realisation for farmers; Agriculture food stuffs including cereals, edible oils, oilseeds, pulses, onions and potato will be deregulated.#AatmaNirbharDesh #AatmanirbharBharat pic.twitter.com/qVfoVXVmZl
— PIB India (@PIB_India) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.