HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये –  मुख्यमंत्री

सोलापूर | राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज (१९ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरला दौऱ्यासाठी गेले आहेत. पुर भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री असे म्हणाले की, “पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. “विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळले नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल”, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

“राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित केला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीसही मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्राकडे मदत मागितली. त्यावर पंचनामे करण्याची वाट न पाहता मदत करावी असे फडणवीस म्हाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे.

“केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. देशाचं सरकार आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन करुन मदतीचं आश्वसन दिलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार, यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?”

News Desk

आधार कार्ड पडताळणीसाठी आता चेहऱ्याचा आधार

swarit

स्वत: समृद्ध होण्यासाठी पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले का ?

News Desk