HW News Marathi
राजकारण

भाजपच्या उमेदवाराचा अमर्याद खर्च, निवडणूक आयोगाने लक्ष घालावे

मुंबई | पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा कडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला आहे. या निवडणुकीत निवडणूक यंत्रणा कुचकामी ठरलीच, परंतु यामुळे संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणालेत. तसेच भाजपच्या उमेदवाराने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अमर्याद खर्च केल्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी देखील सावंत यांनी केली आहे.

मंगळवारी नवी दिल्ली मध्ये सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुनील अरोरा यांच्यासह संपूर्ण निवडणूक आयोगाने काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाने प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशांचा गैरवापर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निवडणुक प्रचारादरात साम, दाम, दंड भेदाची भाषा वापरली आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटून मुख्यमंत्र्यांची भाषा खरी करून दाखवली. या सर्व गैर प्रकारांबाबत तसेच निवडणूक अधिका-यांच्या पक्षपाती भूमिकेसंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली व कारवाईची मागणी केली असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणालेत.

 

 

 

Related posts

भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… !

News Desk

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग

swarit

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

News Desk