HW News Marathi
राजकारण

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

मुंबई | पालघर निवडणुकीनंतर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाकडून युती करण्यासंदर्भात दोन पाऊले पुढे टाकली गेली असतानाही शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता भाजपने सेनेला प्रत्युत्तर दिल्याचे पहायला मिळत आहे. पालघरमध्ये भाजपाला मिळालेल्या यशा नंतर शिवसेनेशी युती नसतानाही आपण जिंकू शकतो त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपाच्या पदाधिका-यांना दिला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर दादरच्या वसंतस्मृती या भाजपाच्या कार्यालयात भाजपाच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे बैठकीत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना महत्वाचा चर्चेचा विषय असल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत पक्षाच्या पदरी अपयश आले असले तरी पालघर मध्ये शिवसेनेशी सामना करताना ही पोटनिवडणूक भाजपाला कठीण जाईल असे वाटत होते. परंतु पालघरमध्ये मिळालेल्या विजयामुळे मित्र पक्ष शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो आगामी निवडणूकीच्या तयारीला लागा असा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बौठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आघाडी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळणार !

News Desk

भाजप हा बुडणारं जहाज | अशोक चव्हाण

News Desk

अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

News Desk
क्रीडा

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk

मुंबई | मुंबई क्रिकेट संघात उत्कृष्ट क्रिकेटर ठरलेला आयुष निशिगंध झिमरे या किशोरवयीन क्रिकेटरने आपल्या पालकांसह रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सोमवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. आयुष निशिगंध झिमरे या 15 वर्षीय क्रिकेटरला प्रोत्साहन देताना क्रिकेटमध्ये अधिक नैपुण्य मिळविण्यासाठी सर्व प्रकारची मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

यावेळी रिपाइं चे वॉर्ड अध्यक्ष भास्कर झिमरे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट च्या सामन्यात आयुष झिमरे याने 4 वेळा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज चा बहुमान ज्येष्ठ क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांच्या हस्ते मिळविला. त्याबद्दल आयुष चे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी यावेळी कौतुक केले. क्रिकेट विश्वात चांगली कामगिरी करावी भारतीय क्रिकेट संघाचे भविष्यात आयुषने नेतृत्व करावे अश्या शुभेच्छा आशीर्वाद रामदास आठवलेंनी दिले.

Related posts

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ‘किटअप’ चॅलेंज

News Desk

Ind Vs Pak : भारत पाक पुन्हा एकदा आमने-सामने

swarit

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

swarit