HW News Marathi
देश / विदेश

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तुंचीच विक्री

नवी दिल्ली | देशाला ‘आत्मनिर्भर भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री होणार आहे. हा नवा नियम १ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास १० लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे ५० लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करु शकतील असेही अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

News Desk

अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा

swarit

#PulwamaAttack : संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी जाहीर केलेल्या संघटनांची खाती ब्लॉक करा !

News Desk