HW News Marathi
देश / विदेश

‘भारतात सर्व छान चालले आहे,’ ‘हाऊडी मोदी’ला पंतप्रधान मोदींचे उत्तर

ह्युस्टन | ‘हाऊडी मोदी’ म्हणजेच कसे आहात मोदी? ‘भारतात सर्व छान चालले आहे’, असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना दिले. यावेळी मोदींनी मराठीसह गुजराती, बंगाली, पंजाबी अशा विविध भारतीय भाषांत ‘भारतात सर्व काही छान चालले आहे’ असे म्हणत. उपस्थितीत भारतीयांची मने जिंकली. अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने आयोजित ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींचे ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर हजारो नागरिकांनी अभूतपूर्व स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमामध्ये सुरुवातीचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन झाले. मोदी यांनी ट्रम्प यांचे स्वागत करून ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा नारा दिला. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी सुरुवातीला इंग्रजीतून भाषण केले. त्यानंतर ट्रम्प यांचे भाषण झाले. ‘दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करत असून भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत असल्याचे वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे.

काही लोके दहशतवादाला खतपाणी घालतात. या लोकांची सगळ्या जगाला चांगली ओळख झाली आहे. अमेरिकेला महान बनवणे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करणे हेच ट्रम्प यांचे ध्येय असून अमेरिकेने जगाला खूप काही दिले आहे, असेही मोदी म्हणाले. ह्यूस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राफेलवर चर्चा नाही ?

News Desk

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

News Desk

#PulwamaAttack : केंद्राने काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढून टाकले

News Desk