HW News Marathi
देश / विदेश

उत्तरप्रदेशच्या “प्लॅस्टिक बेबी”वर अमेरिका करणार उपचार

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील हर्रैया पोलिस ठाणे परीसरात रहाणा-या बिनहौनी गावच्या रहिवाशी असलेल्या अनिता देवी यांनी गेल्या गुरुवारी एका मुलाला जन्म दिला आहे. या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही तासांत त्याच्या पालकांना त्यांचे बाळ कोलोडियन (प्लास्टिक) बेबी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तेव्हापासून या बाळाला गावात प्लास्टिक बेबी म्हणून ओळखले जात आहे.

हे बाळ कोलोडियन नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या बाळाच्या जन्मानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाळाला नक्की काय आजार आहे हेच समजले नव्हते. परंतु जेव्हा शहरातल्या एका क्लिनिकचे डॉक्टर असलेल्या शिशीर अग्रवाल यांनी नवजात बाळावर उपचाराला सुरुवात केली तेव्हा त्याला चार दिवस लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेऊन उपचार सुरु केले होते.

परंतु आता या बाळावर अमेरिकेतील डॉक्टरांच्या मदतीने उपचार करण्यात येणार आहेत. बाळाच्या प्रकृतीची माहिती प्रत्येकी चार दिवसांनी अमेरिकेतील डॉक्टरांना देण्यात येत आहे . हारवर्ड मेडिकल स्कूल अमेरिका या बाळाच्या आजाराचा शोध घेत आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती बहराइच येथील एका क्लिनीकचे डॉक्टर असलेले शिशीर अग्रवाल हे अमेरिकेला पाठवणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार या बाळाचे आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. सध्या या बाळाला लाइफ सपोर्ट सिस्टम वरुन काढण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी बाळाला दुध पाजण्यात आले होते. तसेच येत्या तीन दिवसात बाळाला घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओडिशानंतर आता ‘या’ राज्यातही १ मेपर्यंत लॉकडाऊन

News Desk

‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी घातल्यानंतर मेहबूबा मुफ्तींचा काश्मीरमध्ये मोर्चा

News Desk

आनंदवार्ता ! मान्सून केरळमध्ये दाखल

News Desk