मुंबई | राज्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड गोंधळलेले आहे. अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात वाद, टीका सुरू आहेत. काल (१४ ऑक्टोबर) शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर तोफ डागली होती. आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं म्हटलं होते.
एचडब्ल्यू मराठीची ही बातमी अमृता फडणवीसांनी रिट्विट करत त्यावर “मेरे पास ना घर ना द्वार फिर क्या उखाडेगी बुलडोझर सरकार? “,असे लिहीत ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
मेरे पास ना घर न द्वार,
फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ? https://t.co/RCLKwtM3tU— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 15, 2020
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ऑफिसवर महापालिकेने बुलडोझर फिरवला होता.त्या मुद्द्याचा अप्रत्यक्षपणे इथे उल्लेख त्यांनी केला आहे.
“अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”. “आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे.आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता.
तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर सुरू न केल्यामुळे हिंदुत्वाची आठवण पत्रातून करून दिली होती. त्यावरही अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ज्यात त्यांनी “वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते” अशी टीका केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.