HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांकडे गोव्याचाही प्रभार आहे, तिकडे दारुची दुकाने उघडी आणि मंदिरे बंद आहेत…थोरात

मुंबई | राज्य सरकारने मंदिरे खुली करावी अशी मागणी केली जात आहे. त्यावरुन विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. मात्र, मंदिरे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्रातून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का?”

तर, “राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?” असा सवाल विचारत पलटवार केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

News Desk

कंगना फक्त कारण आहे, बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे !

News Desk

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्याबाबत राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल – मुंबई हायकोर्ट

News Desk