HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज आहे, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | राज्यात अद्याप मंदिरे सुरु न केल्यामूळे भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. राज्यभर आंदोलन केले जात असतानाच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यावर भजन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यात उडी घेतली आहे. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं. दारूची दुकानंही सुरू केलीत. पण मंदिरं सुरू केली नाहीत. अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत खरमरीत भाषेत हे पत्रं लिहिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर टीका केली आहे. मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे. सर्वकाही सुरू करण्यात आले पण मंदिरं सुरू करण्यात आली नाहीत. माणसाला जशी भुकेची गरज असते, तशीच मन:शांतीचीही गरज असते. भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तुम्हालाच हिंदुत्व शिकवावं लागेल. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. स्वातंत्र्यावीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली तेव्हा तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? त्यांना नेमकं काय करायचं आहे? कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का? मंदिरात गेलेल्या माणसावर कोरोना हल्ला करतो का?, विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

News Desk

पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयलांना शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी विनंती!

News Desk

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री

News Desk