HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काॅलर उडवणे भाजपच्या शिस्तीत बसत नाही !

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.

उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!’, अशा शब्दात राष्ट्रवादीतून नुकत्याच भाजपत आलेल्या उदयनराजे भोसले यांची सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

 

अग्रलेखमध्ये नेमके काय म्हटले

लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. ‘‘कोण मोदी? आमच्या साताऱयात मोदी पेढेवाले आहेत’’ असे त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करीत बजावले होते. मोदींच्या सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत व्यक्त केला होता. आता त्यांनी मन बदलले आहे व मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे विचार मांडले आहेत. परंतू, आता भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्याचप्रमाणे, उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हेत, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल. असेही अग्रलेखात म्हटले आहे.

येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन! भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vaibhav Pichad BJP | शरद पवारांचा आयुष्यभर ऋणी राहिन..

News Desk

Shivendra Raje Bhosale NCP | बाबाराजे, तुम्ही भाजपमध्ये जा ! कार्यकर्त्यांच्या भावना

Gauri Tilekar

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

News Desk