HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, आदेश द्यायचा !

सातारा । महाराजांनी मागण्या करायच्या नाही. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. महाराजांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांचा सन्मान केला.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपची साताऱ्यात काल ( १५ सप्टेंबर) महाजानदेश यात्रेची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंनी तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. छत्रपतींच्या घराण्याने तुम्हाला खूप काही दिले. मात्र तुम्ही त्यांना काय दिले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वत:ला विचारावा, अशी टीका केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, छत्रपतींचे घराणे हे घेणारे घराणे नाही, तर देणारे घराणे आहे. राज्यातले महायुतीचे सरकार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतेय. ५ वर्षांत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली आहेत. साताऱ्यातले प्रकल्पदेखील पूर्ण केले जातील, असे फडणवीस यांनी म्हटले. साताऱ्यातली रस्त्यांची कामे करावीत. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, अशा मागण्या उदयनराजेंनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात भरभरून स्वागत झाले त्यासाठी मी सातारकरांचे मनापासून आभार मानतो. उदयनराजे यांनी मला पगडी दिली शिवेंद्रराजे यांनी तलवार दिली. त्यामुळे मी आता छत्रपतींचा मावळा आहे. महाराजांनी मागण्या करायच्या नसत्या. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी मुख्यमंत्री दिले. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयराजेंना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राष्ट्रवादी-काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक, युतीच्या जागा वाटपावर चर्चा

News Desk

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक ११ सप्टेंबरला करणार भाजप

News Desk